सकारात्मक   विचार 

('इस दुनियाको आप  जेसा देखोगे, वेसा पाओगे')
 या जगाला तुम्ही जसे पाहाल, तसे ते जग तुम्हाला दिसेल. 
त्यासाठी गरजेचे असतात ते आपले विचार. विचार हि अशी 'प्रतिमा शक्ती' आहे कि तुम्ही जो तुमचा  विचार सत्यात उतरवते पण त्यासाठी तुमचा विचार  मजबूत असला पाहिजे.  
 विचारांचे दोन प्रकार असतात ,
                १- सकारात्मक विचार.  
                २- नकारात्मक विचार. 

पहिला विचार म्हणजे सकारात्मक विचार जी अशक्य  गोष्ट शक्य करून दाखवणारे विचार येतात त्या विचारांला सकारात्मक विचार म्हणतात. 
 
दुसरा विचार म्हणजे नकारात्मक  विचार जी अशक्य गोष्ट करण्यासाठी जे विचार विरोध करतात त्यांना नकारात्मक विचार म्हणतात. 

एखादी नवीन गोष्ट किंवा एखादी अशक्य गोष्ट करण्यासाठी हजारो विचार आपल्या मनामध्ये येत असतात, आपल्या मनावर असते कि आपण कोणता विचार स्वीकारायचा कोणता स्वीकारायचा नाही . 
जेव्हा तुम्ही कोणत्या संकटात अससतात तेव्हा तेथे तुमचा मेंदू शांत ठेऊन सकारात्मक विचारांचा प्राधान्य दिले पाहिजे. 
 सकारात्मक विचार तयार होण्यासाठी तेथील अवती भोवतालचे वातावरण सकारात्मक पाहिजे. नकारात्मक विचारांसोबत राहणं खूप अवघड असते, पण तेथेच आपली सकारात्मक विचार टिकून ठेवण्याची  खरी परीक्षा असते.
सकारात्मक विचार सत्यात उतरवण्यासाठी काही प्रयत्नच केले नाही ता सकारात्मक विचार ठेऊन काही उपयोग नाही. सकारात्मक विचारांबरोबर खुपसारे हसले पाहिजे. हसणे हि क्रिया आपला सर्व थकवा दूर करते. 





                  

Comments